
छत्रपती शिवरायांनी दिली समतेची शिकवण…
ह भ प सुनील महाराज आष्टिकर
मुदखेड दि. १९
श्री क्षेत्र मुदखेड येथे श्री गणेश मंदिर कलशारोहण निमित्ताने श्री गणेश पुराण कथा आयोजित करण्यात आली व हजारो श्रोत्यांच्या उपस्थित मध्ये मुदखेड ला पंढरपूर नगरीचे स्वरूप आले आहे ।
आज छत्रपती शिवरायांची जयंती निमित्त शिवरायांचे कार्य व संघटना व समता या गोष्टिचा उल्लेख करतांना सुनील महाराज भाऊक झाले आज आपण परमार्थ करु शकतो ऊंच मानेने हिंदू म्हणुन वावरतो अनेक सप्ताह किर्तन महोत्सव भागवत कथा व सत्संग तसेच समाजाला दिशा देण्याचे कार्य करु शकतो हे
कुणामुळे शक्य झाले तर ते फक्त छत्रपती मुळे संघटनात्मक कार्य करत शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्र करुन सामाजिक विषमता दुर करुन समतेची शिकवण दिली असे सुनील महाराज आष्टिकर यांनी सांगितले श्री गणेश पुराण कथा आम्हाला भक्ती मार्गा सोबत तत्त्वज्ञान व सांघीक ऐक्य शिकवते श्री गणेश हि बुध्दिची देवता आहे गणेशाचं वर्णन करतांना महाराज म्हणाले की ज्यांना गणांच नेतृत्व करायचं आहे तो गजमुख असला पाहिजे म्हणजे तो नेतृत्व करु शकतो नेतृत्व असं करा की जेणेकरून वैरभाव नाहि तर समता निर्माण होईल असे ह भ प सुनील महाराज आष्टिकर यांनी सांगितले
यावेळी यशराज डांगे व अथर्व डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची गाणी गायली
संगीत मय वातावरणात चार तास केव्हा निघून जातात कळत नाही तबला साथ श्री निवास कुलकर्णी गायन व सिंथ श्रीनाथ कवडेकर पॅड वादक राजेश जाधव सुंदर देखावा ह भ प भरत महाराज उपाध्य हे करत आहेत भाविक भक्तांची उपस्थिती हि विश्र्वस्तांच्या यशाची पावती आहे





Updated Video